27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKokanराज्यात उन्हाचा कहर, उष्म्याने जनता भिजून चिंब

राज्यात उन्हाचा कहर, उष्म्याने जनता भिजून चिंब

हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यातील तापमानात पुढील पाच दिवसामध्ये पुन्हा वाढ होणार असून, अती उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमानात काही ठिकाणी सतत बदल होत असल्याने, ढगाळ वातावरणामुळे वातावरणात घट झाली आहे. हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यातील तापमानात पुढील पाच दिवसामध्ये पुन्हा वाढ होणार असून, अती उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवड्यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापुरात पाऊस झाला. यामुळे वातावरणात काही ठिकाणी गारवा होता. मात्र दिवसा मात्र तापमानात पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही पुन्हा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईसह देशभरातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्मा सहन करावा लागत आहे. अशातच ३० एप्रिल पर्यंत उकाडा अजून वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात भयंकर उष्णतेची लाट वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून, पुढील ४८ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व संलग्न भागात मेघगर्जनेसह पावसाची देखील शक्यता आहे. तसंच, पुढील पाच दिवस विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

देशातील ७० टक्के भागांत उष्णतेची लाट सुरू आहे. देशातील ३३ शहरांत तापमान ४४ अंशापेक्षा जास्त  होते. यात ७ शहरांत तापमान ४५ अंशाहून अधिक होते. दरम्यान, महाराष्ट्रात २५ हून अधिक शहरांत पारा ४० ते ४१ अंशाच्या वर सरकला आहे. दरम्यान ३० एप्रिलपर्यंत आता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये लाट कायम राहणार आहे. विदर्भात मात्र यानंतरही ही लाट कायम राहणार आहे. या काळामध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अजून १ ते ३ अंश वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढच राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular