25.5 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraकोल्हापूरकर कविता बनली केबीसी १४ सीझनची, १ कोटी जिंकणारी पहिली स्पर्धक

कोल्हापूरकर कविता बनली केबीसी १४ सीझनची, १ कोटी जिंकणारी पहिली स्पर्धक

कविता २००० सालापासून या शोचा भाग बनू इच्छित होती, परंतु तिचे हे स्वप्न २१ वर्षे १० महिन्यांनंतर पूर्ण झाले आहे.

कविता चावला, मूळची कोल्हापूरची असून, ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १४ मध्ये १ कोटी जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. मात्र, शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देऊन कविताने ७.५ कोटी जिंकले का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता २००० सालापासून या शोचा भाग बनू इच्छित होती, परंतु तिचे हे स्वप्न २१ वर्षे १० महिन्यांनंतर पूर्ण झाले आहे.

कविता म्हणते, “मला इथपर्यंत पोहोचून खूप आनंद होत आहे. मला खूप अभिमान वाटतो की मी १ कोटी जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. मला आशा आहे की ७५ कोटींचे प्रश्नाचे देखील मला उत्तर देता येईल. माझे वडील आणि माझा मुलगा विवेक मुंबईत माझ्या सोबत आले आहेत आणि मी १ कोटी रुपये जिंकले आहेत हे कोणालाच माहीत नाही. त्या लोकांनी हा शो पाहावा आणि त्यांना सरप्राईज मिळावे अशी माझी इच्छा आहे.”

त्यांनी बारावीपर्यंतच कविता शिकल्या, तरीही त्यांनी शिकण्याची आणि वाचण्याची आवड कायम ठेवली. कविता म्हणाली, मी वाचत राहण्याचे एक कारण म्हणजे केबीसी. २००० साली हा शो सुरू झाल्यापासून मला त्याचा एक भाग व्हायचे होते. गेल्या वर्षीही केबीसीमध्ये येऊन मी फक्त फास्टेस्ट फिंगर राउंड गाठू शकले. या वर्षी मी इथपर्यंत पोहोचण्याचे माझे स्वप्न पूर्ण केले आहे. जेव्हा मी माझ्या मुलाला शिकवायचे, तेव्हा त्याच्यासोबत खूप काही शिकायचे.

कविताला विचारले की या पैशाचे ती काय करणार? या जिंकलेल्या पैशातून मी माझ्या मुलाला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवणार असल्याचे कविता सांगतात. पुढच्या प्रश्नाचे उत्तर देऊन मी ७.५ कोटी जिंकले तर मी माझ्यासाठी बंगला बांधून जगभर फिरेन.

RELATED ARTICLES

Most Popular