25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeRatnagiriबाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण गद्दार कसे...! सामंतांचे प्रत्युत्तर

बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण गद्दार कसे…! सामंतांचे प्रत्युत्तर

तो एक काळ होता, जनतेच्या भावना भडकावून तुम्ही राज्य करायचा. आता पीढी बदललीय, या पीढीला स्वत:च हित कळतं.

रत्नागिरीतील साळवी स्टोप या ठिकाणी काल आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रे दरम्यान जाहीर सभा घेतली. त्या सभेत त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून, वेगळा गट स्थापन केलेल्या बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधून तोंडसुख घेतलं. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आमच्या मतदारसंघात येऊन आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ठरवले हे योग्य की अयोग्य ते सांगावे.

कॉग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण गद्दार कसे. ह्याला धाडस म्हणतात. असं म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलच प्रत्यूत्तर दिले आहे. या मुद्द्यावरून शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी देखील आदित्य ठाकरे यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, जनतेच्या भावनांवर राज्य करण्याची वेळ आता निघून गेली आहे.

तो एक काळ होता, जनतेच्या भावना भडकावून तुम्ही राज्य करायचा. आता पीढी बदललीय, या पीढीला स्वत:च हित कळतं. मंत्री म्हणून तुम्ही तुमची कामगिरी सांगत सगळीकडे फिरा. जल्लोष कोणीही दाखवू शकतो. जल्लोष आणि मतदान यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे तुम्ही मंत्री असताना काय केलं? हे तुम्ही सांगितलं पाहिजे. गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते. लीडरशीप ही राज्याच्या विकास करण्यासाठी असते असं दिपक केसरकर म्हणाले. त्यामुळे सभाना केवळ गर्दी जमवून अशा प्रकारची वक्तव्ये करून काही उपयोग होणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular