केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा प्रायोगिक तत्वावर मंजुर केल्यानंतर तालुक्यातुन आणि चाकरमान्यानी आनंद व्यक्त केला. ही गाडी मंगळवारपासून (२२ ऑगस्ट) संगमेश्वरला थांबणार आहे. कोंकण रेल्वेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहीती दिली आहे. मुंबईहून तिरुवंतपुरमला जाणारी १६३४५ मुंबईच्या ही गाडी सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ११-४० ला सुटेल. १२-०५ ला ठाण्याहुन १२-५०ला पनवेलहून सुटुन संगमेश्वरला संध्याकाळी ५-३४ वा पोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (१६३४६) सकाळी ९-५८ ला संगमेश्वरहून सुटेल. आज भव्य स्वागत होणार!
गेली अनेक वर्ष मागणी केल्यानंतर अखेर संगमेश्वरला नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्यात आला. मंगळवारी या गाडीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. संगमेश्वर-चिपळुणचे आमदार शेखर निकम या थांब्यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार संदेश जिमन; माजी आमदार सुभाष बने; कोंकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर; तसेच सर्वपक्षिय पदाधिकारी; व्यापारी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी तालुकावासीयानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.