तालुक्याचे दापोली व गुहागर अशा दोन मतदार संघात विभाजन झाले असले तरी देखील तालुक्याचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन शिवसेना काम करत आहे. खेड तालुक्यातील गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या ५२ गावांमध्ये ३५ कोटी रुपयांची विकासकामे राज्य सरकारकडून मंजूर करून घेण्यात यश आले आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले की, गुहागर मतदार संघातील ५२ गावांमध्ये ३५ कोटींचा विकासनिधी आम्ही मंजूर करून घेण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामध्ये गुहागर मतदारसंघात ३५ कोटी ८६ लक्ष ७६ हजार निधीतून २९६ विकासकामे केली जाणार आहेत.
खेड तालुक्यातील साखर, शिशी, कोरेगाव, निगडे, अणसपुरे, तळवट खेड, कुरवळजावळी, भेलसई, वावे तर्फे खेड, कासई, सपिली, काड़वली तळवट पाल, चोरवणे, निवे, धामणंद, मुसाड, बहिरवली, लवेल, शेल्डी, मेटे, कर्जी, सवणस, तुंबाड, होडखाड, राजवेल, भोस्ते, शिव, आयनी, खोपी, मिलें’, जांबुर्डे, निळीक, शिरगाव, दयाळ, मुंबके, दाभीळ, कावळे, पोसरे, गुणदे, संगलट आदी ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण २१ कोटी ०४ लक्ष २२ हजार रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत.
आवाशीमध्ये १ कोटी ९ लक्ष ५७ हजार, असगणी मध्ये १ कोटी ८४ लक्ष ५२ हजार, चिरणी मध्ये १ कोटी २६ लक्ष ९० हजार, आंबडस मध्ये १ कोटी १४ लक्ष ८२ हजार, अंजनी मध्ये १ कोटी २९ लक्ष ९८ हजार, कोतवलीमध्ये १ कोटी ७४ लक्ष १४ हजार सोनगाव मध्ये १ कोटी ७४ लक्ष १० हजार, धामणदेवी मध्ये १ कोटी १९ लक्ष ७९ हजार, घानेखुंट मध्ये १ कोटी ६४ लक्ष ५९ हजार, लोटे मध्ये १ कोटी ८४ लक्ष २२ हजार अशी एकूण १४ कोटी ८२ लाख ५५ हजार रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून खेड तालुक्यातील गुहागर मतदार संघात समावेश झालेला भाग विकासापासून दुर्लक्षित झाला होता. मात्र आता या विकासनिधीतून या भागात नक्कीच विकासाला चालना मिळेल. या निधीतून अनेक ठिकाणी संरक्षक भिंती उभारणे, स्मशानभूमी बांधणे, प्रमुख जिल्हा मार्ग डांबरीकरण, गावांतील मुख्यरस्ते डांबरीकरण, पाखाडी, स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते मजबुतीकरण, बंदिस्त गटार बांधकाम, स्मशानभूमी कंपाऊंड वॉल, साकव बांधणे, समाजमंदिर बांधणे, सभा मंडप बांधणे, विहिरी बांधणे, धोबीघाट, बांधणे, पाण्याची टाकी बांधणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत. जिल्हा वार्षिक योजना, डोंगरी विकास कार्यक्रम आदी विविध योजनांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती कदम यांनी दिली