25.4 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriकोकण रेल्वे गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण, रेल्वे तिकीट फक्त पन्नास रुपये

कोकण रेल्वे गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण, रेल्वे तिकीट फक्त पन्नास रुपये

'पनवेल-चिपळूण डेमू गाडी ४ ते ३० सप्टेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या रेल्वे प्रवासाचे तिकीट फक्त ५० रुपये आहे. ही माहिती शुक्रवारी झालेल्या पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आली. ‘पनवेल-चिपळूण डेमू गाडी ४ ते ३० सप्टेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे. या गाडीला १२ डबे असतील. त्यामध्ये एक पहिल्या वर्गाचा व एक महिलांचा डबा असणार आहे.

या गाडीचे आरक्षण होणार नसून, प्रवाशांना करंट बुकिंग करावे लागणार आहे. जुन्या रेल्वे स्थानकाच्या खिडकीवर तिकिटे उपलब्ध होतील. ही गाडी सकाळी ११.१० वाजता सुटेल पनवेल येथून सुटेल. ती गाडी रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सपे वामने, करंजाडी, विनहेरे, दिवाणखावटी, खेड, अंजनी, असा प्रवास करून संध्याकाळी चिपळूणला ४ वाजता पोहचेल. चिपळूणहून ती गाडी सायंकाळी ५.३० वाजता पनवेलकडे याच मार्गाने रात्री १०.३० वाजता पोहोचेल.

RELATED ARTICLES

Most Popular