27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...

कोत्रेवाडी कचरा प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा…

कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा डंपिंग...
HomeKhedरात्रीची केवळ एकच विशेष गाडी, कोकण रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय

रात्रीची केवळ एकच विशेष गाडी, कोकण रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय

सर्व फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्लच झाल्याने प्रवाशांचा रेटारेटीचा प्रवास सुरू आहे. 

उन्हाळी सुट्टी हंगाम लग्नसराईमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल हाऊसफुल्ल धावत आहेत. त्यातच मध्यरेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर आठवड्यातील पाच दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस थिविम-ही एकच रात्रीची विशेष गाडी चालवण्यात येत आहे. यामुळे सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. उत्तर रत्नागिरीच्या स्थानकांसाठी दिवसा धावणारी विशेष गाडी चालवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून ३२२ उन्हाळी स्पेशल जाहीर करत चाकरमान्यांना दिलासा दिला असला तरी सर्व फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्लच झाल्याने प्रवाशांचा रेटारेटीचा प्रवास सुरू आहे.

०१०१७/०१०१८, ०११८७/०११८८ आणि ०११२९/०११३० या क्रमांकाने कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्या आठवड्यातून वेगवेगळ्या दिवशी धावतात. या गाड्या मुंबईतून गोव्याला जाताना रोहा येथे मध्यरात्री १.१५ वाजता, माणगावात मध्यरात्री १.३६ वाजता, वीर स्थानकात मध्यरात्री १.४८ वाजता, खेड येथे मध्यरात्री २.३८ वाजता, चिपळूण मध्यरात्री ३ वाजता, सावर्डे मध्यरात्री ३.२० वाजता तर संगमेश्वर येथे मध्यरात्री ३.३८ वाजता पोहोचतात. परतीच्या प्रवासात खेडला रात्री १० वाजता, वीरला रात्री ११.३० वाजता, माणगाव येथे रात्री १२.३० वाजता तर रोह्याला रात्री १.३५० वाजता दाखल होतात.

दुसऱ्या बाजूला तुलनेने सोयीच्या वेळेत धावणाऱ्या ०१४६३/०१४६४ क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस-कोच्युवेली एक्सप्रेसला केवळ चिपळूण व रत्नागिरी येथेच थांबे असल्याने इतर स्थानकासाठी तिचा लाभ होत नाही. या विशेष गाड्यांना रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना म्हणावा तसा फायदा होत नाही. म ध्य रेल्वेच्या मुंबई व पुणे मंडळात उत्तर भारतात जाण्यासाठी गाड्या सोडण्याची स्पर्धा लागलेली असताना कोकणात गाड्या सोडण्याची गरज कोणाच्याच लक्षात येत नाही, ही खेदजनकच बाब असल्याचा सूरही आळवला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular