होळीच्या सणासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून मुंबई ते सावंतवाडी दरम्यान होळी स्पेशल गाड्या धावणार आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई सीएसएमटी आणि लोकम ान्य टिळक, टर्मिनस येथून सावंतवाडी रोडसाठी विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १. मुंबई सीएसएमटी सावंतवाडी रोड विशेष ही गाडी साप्ताहिक स्वरूपात धावणार असून प्रवाशांची सोय करणार आहे. गाडी क्र. ०११७१: २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी मुंबई सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. गाडी क्र. ०११७२: २६ फेब्रुवारीआणि ५ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी सावंतवाडी रोडवरून संध्याकाळी ५:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल. थांबेः दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेडं, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
डब्यांची रचनाः एकूण २२ कोच (२ टायर एसी-१, ३ टायर एसी-६, स्लीपर-९, जनरल-४, एसएलआर-२). २. एलटीटी सावंतवाडी रोड विशेष ही गाडी देखील साप्ताहिक असून कोकण मार्गावरील गर्दी कमी करण्यास मदत करेल. गाडी क्र. ०१११९:२६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी एलटीटीवरून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. गाडी क्र. ०११२०: २७ फेब्रुवारी, आणि ६ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी सावंतवाडीवरून संध्याकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:५ वाजता एलटीटीला पोहोचेल. थांबेः ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुंडाळ, डब्यांची रचनाः २२ एलएचबी कोच (पहिला एसी-१, २ टायर एसी-३, ३ टायर एसी-७, स्लीपर-८, पॅन्ट्री कार-१, जनरेटर कार-२). या विशेष गाड्यांचे (०११७२ आणि ०११२०) बुकिंग १८ फेब्रुवारी २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्र, आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि अॅपवर सुरू होईल.

