26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeSindhudurgविस्कळीत कोकण रेल्वे हळूहळू रुळावर

विस्कळीत कोकण रेल्वे हळूहळू रुळावर

कोकण रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यास सुरवात केली.

कोकण रेल्वेमार्गावर पेडणे येथील बोगद्यात जमिनीतून पाणी येऊ लागल्यामुळे बुधवारी दिवसभर कोकण रेल्वे ठप्प झाली होती. रात्री ८.३० वाजल्यानंतर या रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरू झाली. विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू सुरळीत होत आहे. गुरुवारी मडगाव येथून मुंबईकडे जाणारी वंदे’ भारत एक्स्प्रेस तसेच मंगळूर येथून मुंबईसाठी सुटणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. गोव्यातील पेडणे येथील बोगद्यामध्ये मंगळवारी रात्री जमिनीतून वेगाने पाणी येऊ लागल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक थांबली होती.

बाहेरून येणाऱ्या रेल्वे पर्यायी मार्गान वळवण्यात आल्या. बुधवारी रात्री सुमारे १७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वेमार्गावरून गाड्या रवाना होऊ लागल्या. मत्स्यगंधा एक्स्प्रेस पेडणे टनेलमधून सर्वांत प्रथम धावली. त्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यास सुरवात केली. गुरुवारी दिवसभरात सर्वच गाड्या रूळावर आल्या. काल अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे अनेक प्रवाशांना माघारी परतावे लागले. काहींनी खासगी, तर काहींनी एसटी बसेसचा पर्याय निवडला; मात्र कोकण रेल्वेच्या अथक परिश्रमामुळे एका दिवसातच रेल्वे पुन्हा रूळावर आली.

दरम्यान, कोलमडलेले वेळापत्रक सुरळीत होण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी धावणारी नागपूर-मडगाव एक्स्प्रेस पाच तास उशिराने धावत होती, तर सायंकाळी साडेपाच वाजता घेतलेल्या माहितीनुसार, दिवा-सावंतवाडी १ तास १० मिनिटे, मुंबईहून आलेली मांडवी ३० मिनिटे, मंगला एक्स्प्रेस ५० मिनिटे, निजामुद्दीन-थिवी एक्स्प्रेस १ तास ३७ मिनिटे, हापा – मडगाव ३० मिनिटे इतक्या उशिराने काही गाड्या धावत होत्या. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत झाली. पेडणेतील प्रकारामुळे प्रवासी वेळापत्रक पाहूनच रेल्वेस्थानकाकडे जात होते.

RELATED ARTICLES

Most Popular