24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriगणेशोत्सवात 'कोरे'चा प्रवाशांना दिलासा...

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

रेल्वे प्रशासनाने ३८० हून विशेष रेल्वे फेऱ्या चालवून एक नवा आदर्श निर्माण केला.

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष नियोजनामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. कोकण रेल्वेत कोकणचे प्रतिबिंब दिसून आले. मुंबईसह पुण्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय झाली. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर तो एक उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना पुरेपूर आनंद देण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांच्या समाधानासाठी वेगवेगळे उपक्रम ही हाती घेण्यात आले होते. कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला. परंतु कोकणवासीयांसाठी हक्काच्या गाड्या अगदी मोजक्या आहेत. मुंबईतून गोवा, कर्नाटक, केरळकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कोकणातील चाकरमान्यांना स्थान मिळते. खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबत होत्या. रेल्वे प्रशासनाने ३८० हून विशेष रेल्वे फेऱ्या चालवून एक नवा आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश गाड्या कोकण-मर्यादित होत्या.

त्यांना खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी मर्यादित थांबे होते. त्यामुळे परराज्यातील प्रवाशांची गर्दी या गाड्यांमध्ये नव्हती त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार ही रोखला गेला. रेल्वे प्रशासनाने बहुतांश गाड्या ह्या तळकोकणापर्यंत म्हणजेच सावंतवाडीपर्यंत चालवल्या. कोकणवासी चाकरमान्यांना कोकणातील प्रत्येक तालुक्यातील भागात जाण्यासाठी रेल्वेची सोय मिळाली. स्थानक परिसरात विशेष सेल्फी पॉईंटस्, आकर्षक विद्युतरोषणाई, कलात्मक रांगोळी आणि पूजा साहित्य स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामुळे स्थानकांवर गणेशोत्सवाचे चैतन्य ओसंडून वाहत आहे. अनेकांना रोजगार मिळावा यासाठी तात्पुरती स्टॉल ही उपलब्ध करून देण्यात आले होते. कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने लाखो चाकरमानी दाखल झाले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५००० हून अधिक एसटी चाकरमान्यांना घेऊन कोकणात दाखल झाल्या. एसटी आणि कोकण रेल्वेचे नियोजन यावर्षी यशस्वी झाले. त्यामुळे कोकणात आलेले चाकरमानी आनंदी होते.

चोरीच्या प्रकारावर आळा – कोकण रेल्वे मार्गावर चोरीचे प्रकार घडू नये यासाठी आरपीएफने बंदोबस्त ठेवला होता गोवा, कर्नाटक येथून जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. तब्बल सव्वाशे पोलीस कर्मचारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्थानकावर सेवा देत होते. त्यामुळे चोरीचे प्रकार झाले नाहीत,

RELATED ARTICLES

Most Popular