26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीसमोर चौकशी

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीसमोर चौकशी

एसीबीने वैभव नाईक यांच्याकडे २००२ ते २०२२ पर्यंतच्या सर्व उत्पन्न आणि खर्चाचा तपशील मागवला होता.

कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीची नोटीस आली होती. ५ डिसेंबरला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे नोटीसमध्ये देण्यात आले होते. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक सोमवारी चौकशीसाठी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहिले आहेत. सकाळी ११ वाजता वैभव नाईक रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात येणार असल्याची माहिती मिळाली असून, त्यानुसार वैभव नाईक एसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहिले.

ठाकरे गटातील अनेक आमदार आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना कोकणातील केवळ ३ च नेत्यांनी राजन साळवी, भास्कर जाधव आणि वैभव नाईक अजूनही मातोश्रीशी निष्ठावंत राहिले आहेत. मात्र, आता एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर त्यांचा निर्धार किती दिवस टिकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एसीबीने वैभव नाईक यांच्याकडे २००२ ते २०२२ पर्यंतच्या सर्व उत्पन्न आणि खर्चाचा तपशील मागवला होता. या सर्व कागदपत्रांसह जबाब नोंदवण्यासाठी यावे, असे आदेश एसीबीकडून वैभव नाईक यांना देण्यात आले होते. माझी चौकशी होईल, त्याला मी सामोरा जाईन. मात्र, माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशोबी असेल तर मला फासावर लटकवा. परंतु, मला अटक करून मी भारतीय जनता पार्टी किंवा राणेंसमोर झुकेन, असे कोणाला वाटत असेल तर हे शक्य होणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनाही एसीबीची नोटीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी शिंदे गटात सामील होतील, अशी चर्चा होती. परंतु, अद्याप तसे घडलेले नाही. या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांना आलेल्या नोटीसमागे सूडाचे राजकारण असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. पण मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीन, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे. कितीही कोणत्याही नोटीसा येऊ देत. आपण त्यांना भीक घालत नाही, अशी स्पष्ट व रोखठोक भूमिका राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular