28.5 C
Ratnagiri
Tuesday, April 16, 2024

आनंदाची बातमी! यंदा पाऊस १०६ टक्के बरसणार

एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून...

कोरे प्रकल्पग्रस्तांना रोजगार द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तिन्ही जिल्ह्यांत...

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून थेट गुन्हाच दाखल

खेड शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे....
HomeRatnagiriविश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळगावी देशवासीय भेट देत भूमीला नतमस्तक होत अभिवादन करत आहेत.

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, २ फेब्रुवारी सुभेदार मेजर रामजी सकपाळ स्मृतिदिन, २० मार्च चवदार तळे सत्याग्रह, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मोठ्या संख्येने जगभरातून नागरिक अभिवादन करण्यासाठी आंबडवे येथे त्यांच्या मूळगावी उपस्थित राहतात. डॉ. आंबेडकरांची स्मारके जगभरात होत असताना त्यांच्या वतनाचा वारसा सांगणाऱ्या आंबडवे गावात त्यांच्या स्वरूपाचे स्मृतीचिन्ह असावे, या हेतूने नैतिक कर्तव्यातून आंबडवे पंचक्रोशीसह मंडणगड तालुक्यातील बहुजन समाजाने पुढाकार घेत डॉ. आंबेडकर स्मारक मंदिर कमिटीची स्थापना करत मुळगावातील स्मारक पूर्णत्वास नेले.

चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, चिपळूण स्थानिक व मुंबई यांच्यावतीने चिपळुणातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाचे व त्यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीवर प्रबंध लिहिणारी एलियार झेलियट या अमेरिकन विद्यार्थिनीने ९ फेब्रुवारी १९६५ ला मुळ वंशाचा शोध लावत आंबडवे गावी भेट दिली. थोर माणसाच्या घराची दुरवस्था पाहून खेद व्यक्त करत रत्नागिरी जिल्हा कार्यालयात अभिप्राय नोंद केला. तत्कालीन जिल्हाधिकारी जे. डी. जाधव यांनी २८ फेब्रुवारी व १४ एप्रिल १९६७ ला आंबडवे गावाला भेट दिली. या दोन घटनांची प्रेरणा घेऊन स्मारकासंबंधी विचार सुरू झाले. १४ एप्रिल १९७२ या बाबासाहेबांच्या जयंतीदिनी मंडणगड-दापोली तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र येत स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा केली.

विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळगावी देशवासीय भेट देत भूमीला नतमस्तक होत अभिवादन करत आहेत. या भूमीने जगाला सर्वश्रेष्ठ असा विद्वान महामानव दिल्याच्या भावना स्मारकातील नोंद वहीत लिखित स्वरूपात व्यक्त केल्या आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून उच्च पदस्थ व्यक्तींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular