26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeMaharashtraसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्षात राहण्याजोगा शिवसेनेचा वर्धापन दिन

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्षात राहण्याजोगा शिवसेनेचा वर्धापन दिन

दैनंदिन वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरवाढ व महागलेला घरगुती गॅस, महागाईचा वाढलेला उच्चांक या सर्वच बाबतीत सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल १०३ रुपयांना विकून केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. शिवसेनेचा काल दिनांक १९ जून २०२१ रोजी ५५ वा वर्धापन दिन सर्व जिल्ह्यात साजरा झाला. परंतु जास्त लक्षात राहिला तो कुडाळचा वर्धापन दिन. कुडाळचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी पेट्रोल सवलतीत, म्हणजे जनतेला १०० रुपयाला २ लिटर पेट्रोल व भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखविणाऱ्याला १ लिटर मोफत पेट्रोल असा कार्यक्रम जाहीर केला, तोही दस्तुरखुद्द खासदार नारायण राणे यांच्या पेट्रोल पंपासमोर! नाक्यानाक्यावर स्वस्त व मोफत पेट्रोल वाटप कार्यक्रमाचे बॅनर लावले होते. त्यामुळे राणेसमर्थक संतप्त झाले होते. मोठी जाहिरात बाजी झाल्याने लाभ घेण्यासाठी वाहन चालकांची मोठी रांग लागली.

भाजप सदस्यांना प्रत्येकी एक लिटर पेट्रोल मोफत आणि तेही खासदार राणे यांच्या पेट्रोल पंपासमोर हे जाहीर झाल्यावर व यावरून निर्माण होणाऱ्या तणाव लक्षात घेऊन कुडाळचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी दुसरा पेट्रोल पंप निवडला. या उपक्रमाला वाढलेल्या इंधनवाढीची किनार होती, हा केवळ उपक्रमचं नव्हे तर केंद्र सरकारच्या विरोधात महागाई विरुद्ध केलेल्या आंदोलनच होते. 

याचा जाब विचारण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आमदार नाईक यांच्याकडे मोर्चा वळविला. संतप्त झालेले राणे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत एकमेकांवर मुक्ताफळे उधळली. दोन्ही बाजूकडील समर्थक संतापाने आपली बाजू मांडत होते. पेट्रोलची भावनिक ठिणगी पडणार याचा अंदाज सर्वांनी अगोदरच केला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिकारी आपल्या फौजफाट्यासह हजर झाले, राणेसमर्थक व शिवसेनेला प्रयत्नांची शिकस्त करून बाजूला केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली

त्यानंतर संपूर्ण कुडाळ जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तसेच राखीव पोलीस दल जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी आणण्यात आले. या घटनेनंतर भाजपच्या १५ ते २० व शिवसेनेच्या २० ते २५ जणांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले बद्दल पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री शंकर मोरे यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular