कुवारबाव भाजपा कार्यालयाच्या लगतच्या जागेमध्ये स्वाभिमान स्पोर्ट्स क्लबच्या वतीने क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी कारण देखील तेवढेच विशेष आहे. केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार श्री. निलेश राणे यांचा २४ मार्च रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब ने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाला आजचा चौथा दिवस आहे.
आज कबड्डी पुरुष स्पर्धा सुरू झाल्या त्याप्रसंगी कुवारबाव सरपंच सौ. मंजिरी पाडळकर आणि स्वाभिमान क्लबचे अध्यक्ष श्री सतेज नलावडे यांच्या विनंतीला मान देऊन पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री जोशी यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती लावली. क्लबच्या अध्यक्षांच्या विनंतीनुसार सौ. जयश्री जोशी यांनी श्रीफळ वाढवून कबड्डी स्पर्धांचे उदघाटन केले. त्यांच्या येण्यामुळे गावात होणाऱ्या चांगल्या उपक्रमाला पक्षभेद असो वा विभिन्न विचार सरणी असो, त्या व त्यांचा पक्ष सदैव सोबत असेल असा चांगला मेसेजच या निमित्ताने मिळाला आहे. त्यावेळी क्लबचे अध्यक्ष श्री. सतेज नलावडे आणि क्लबचे सर्व सदस्य यांनी सदर स्पर्धाना खूप छान प्रतिसाद मिळत असून अजून ही महोत्सव असाच थाटामाटात सुरू राहणार आहे असे सांगितले.
बक्षीस समारंभासाठी म्हणजे दिनांक २४/०३/२०२२ रोजी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रीडा महोत्सव सुरू केला आहे ते स्वतः भाजप प्रदेश सचिव श्री. निलेश राणे हे या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत असंही श्री क्लब सदस्य श्री गजानन धनावडे म्हणाले. त्यामुळे स्पर्धकांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.