23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriसत्कोंडीत जमीन खचून घराला धोका - कुटुंबाचे स्थलांतर

सत्कोंडीत जमीन खचून घराला धोका – कुटुंबाचे स्थलांतर

महसूल विभागाकडूनही तत्काळ बैकर कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

जिल्ह्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथे जमीन खचून घराजवळील संरक्षक भिंत कोसळली तसेच घराला भेगाही गेल्या आहेत. तेथील कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तीन ठिकाणी संरक्षक भिंत कोसळून मालमत्तांचे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ९२.५०, दापोली ११७.८५, खेड ७१.२८, गुहागर ८३, चिपळूण ७७.६६, संगमेश्वर ६२.७५, रत्नागिरी ९५.४५, लांजा ५७.४०, राजापूर ८१.१२ मिमी पाऊस झाला आहे.

१ जूनपासून आतापर्यंत सरासरी ७०५ मिमी पाऊस झाला. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जगबुडी नदी सायंकाळी ४ वाजेपर्यंत इशारा पातळीवरून वाहत होती. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथील श्रीमती लक्ष्मी शांताराम बैकर यांच्या घराची जमीन अचानक खचल्यामुळे संरक्षक भिंत कोसळली, तसेच इतर भिंतींना भेगा पडल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी घराची पाहणी केली. महसूल विभागाकडूनही तत्काळ बैकर कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत श्रीमती लक्ष्मी बैकर यांना २०२१ मध्ये घरकूल मिळाले आहे. १ लाख २० हजारांचे हे घरकूल आहे. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे. बैकर यांना दुसरे घरकूल मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे दापोली येथे घराचे १ लाख ४२ हजारांचे नुकसान झाले आहे. पन्हाळेकाजी येथे घराजवळील संरक्षक भिंत कोसळून ५५ हजार ८०० रुपये आणि एक गोठा पडल्याने ३३ हजार ५० रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्वर येथील कोसुंब शाळेची संरक्षक भिंत कोसळून २० हजार रुपयांचे आणि चिपळुणात चिंचघर येथील घराजवळील संरक्षक भिंत कोसळून २ लाखांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular