28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

रेल्वे स्थानकांच्या आज लोकार्पण..

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी,...
HomeRatnagiri'आर्जु टेक्सोल' शी जागामालकाचा करार रद्द, कार्यालयच झाले बंद

‘आर्जु टेक्सोल’ शी जागामालकाचा करार रद्द, कार्यालयच झाले बंद

कंपनीचे कार्यालय देखील न राहिल्याने गुंतवणूकदारांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्जु टेक्सोल प्रा. लि. कंपनीने गुंतवणूकदारांना चुना लावल्यानंतर एमआयडीसीतील ज्या जागेवर कंपनीचे कार्यालय आहे त्याचा करार मूळ जागामालक शकील इस्माइल मोडक यांनी रद्द केला आहे. कंपनी, संचालक, गुंतवणूकदार यांचा या जागेशी काही संबंध नाही, असा कायदेशीर फलक त्यांनी लावला आहे. कंपनीच्या मालकांनी यापूर्वीच चुना लावला आहे. आता कंपनीचे कार्यालय देखील न राहिल्याने गुंतवणूकदारांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच खिळ्याची मशिन देण्याचे सांगून एका गुंतवणूकदाराची १८ लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अनेक गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत. अनेकांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु होऊ शकलेला नाही. काही गुंतवणूकदार तर एमआयडीसीतील कार्यालयाकडे चक्कर टाकत आहेत. कच्चा माल घेऊन पक्का माल परत कंपनी घेऊन मार्केटिंग करणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या आमिषाला भुलून दोन लाखांची गुंतवणूक केली आहे; परंतु आज फसगत झाल्यानंतर ते कंपनीत येऊन गेले. तेव्हा एमआयडीसीच्या ज्या जागेवर आरजू टेक्सोल प्रा. कंपनी त्या कार्यालयाला मूळ मालकाने बोर्ड लावला आहे आणि ही कायदेशीर सूचना असल्याचे स्पष्ट केले आहे.

हा भूखंड क्र. पी-८७ तसेच इमारत मालमत्ता क्र. ८५३ ही मिळकत युअर प्लेसकरिता प्रोप्रायटर शकील इस्माइल मोडक यांच्या खुद्द मालकी वहिवाटीची आहे. या मिळकतीबाबत आरजू टेक्सोल प्रा. लि. यांच्याबरोबर करण्यात आलेला लीव्ह अॅण्ड लायसेन्स करार रद्द करण्यात आला आहे. आर्जु टेक्सोल प्रा. लि. यांचा सदर मिळकतीशी कोणताही संबंध राहिलेला नाही तरी आरजू टेक्सोल प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांनी, पदाधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, गुंतवणूकदारांनी, ग्राहकांनी स्वतः अथवा इतरांमार्फत वर नमूद भूखंड क्र. पी-८७ मध्ये तसेच मालमत्ता क्र. ८५३ मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये व तसा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा फलक दोन दिवसांपूर्वीच लावण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular