26.4 C
Ratnagiri
Saturday, February 14, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriलांजा तालुक्यात बेकायदेशीरपणे गुरांची विक्री, दोघांवर गुन्हा दाखल

लांजा तालुक्यात बेकायदेशीरपणे गुरांची विक्री, दोघांवर गुन्हा दाखल

बोलेरो मॅक्स पिकअप या गाडीतून गुरांची बेकायदा वाहतूक करणारी गाडी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे पकडली.

जिल्ह्यात या आधी देखील मोकाट गुरांना गाडीमध्ये कोंबून त्यांची इतरत्र विक्री करण्यासाठी नेले जात असे. काहीवेळा दुसऱ्या राज्यांमध्ये देखील त्यांची विक्री केली जाते. अनेकदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक प्राणीमात्रांचे जीव वाचते. लांजा वाडगाव रोडवर बेनिखुर्द आसगे फाटा या ठिकाणी रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्याने ही घटना घडली आहे.

बोलेरो मॅक्स पिकअप या गाडीतून गुरांची बेकायदा वाहतूक करणारी गाडी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे पकडली. प्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून दहा गुरांसह बोलेरो मॅक्स पिकअप व्हॅन असा एकूण चार लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की लांजा तालुक्यातून बेकायदेशीरपणे गुरांची विक्री केली जात असल्याची माहिती येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून फिल्डिंग लावली होती. यानुसार रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्याने लांजा वाडगाव रोडवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीपासून फिल्डिंग लावली होती. पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्याने बेनीखुर्द आसगे फाटा या ठिकाणी एक गाडी गुरांची वाहतूक करताना कार्यकर्त्यांना आढळून आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सदर गाडी थांबवली असता गाडीच्या पाठीमागील हौद्यामध्ये दाटीवाटीने १० गुरे बांधून ठेवण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित गाडी चालकाला पकडले आणि लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले.

विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी रफिक सैफनसाब शेख वय ३५ रा. उगार, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक तसेच गणेश लांबोर तालुका लांजा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular