27.9 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeMaharashtraलता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मुंबईमध्ये वितरण

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मुंबईमध्ये वितरण

सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवा करणाऱ्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता.

मी हा पुरस्कार सर्व देशवासीयांना समर्पित करतो. ज्याप्रकारे लतादीदी सर्वांच्या होत्या, त्याचप्रकारे त्यांच्या नावाने दिला गेलेला हा पुरस्कार देखील सर्वांचा आहे.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘लता दिनानाथ मंगेशकर’  स्वीकारल्यानंतर बोलून दाखवलं.

सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवा करणाऱ्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता. आणि पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. या वर्षीपासून हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर या पुरस्काराचे वितरण आज मुंबईतील षण्ङमुखानंद सभागृहात समारंभ येथे पार पडला.

जेंव्हा ६ फेब्रुवारी २०२२ ला लता मंगेशकर यांचे निधन झाले तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्क येथे जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. लतादीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाल्याचे त्यांनी म्हटले होते. आणि लता दीदींच्या नावाने सुरु करण्यात आलेला पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी मंगेशकर कुटुंबियांचे आणि जनतेचे विशेष आभार मानले.

पंतप्रधान मोदी आपल्या पुरस्कारपर भाषणात म्हटले कि,  संगीत एक साधना आणि भावना आहे. जे अव्यक्त आहे, त्याला व्यक्त करण्याचे शब्द आहे. संगीत तुम्हाला राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यबोधाच्या शिखरावर पोहचवू शकते. मी सहसा कोणते पुरस्कार स्वीकारत नाही, पण हा पुरस्कार लतादीदींच्या नावानं आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून असेल तर इथे येणं माझं परम कर्तव्य होतं. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, भाजपा नेते विनोद तावडे आदी उपस्थिती होते.

RELATED ARTICLES

Most Popular