27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraशिवसेना खासदार संजय राऊत यांचा सज्जड इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सज्जड इशारा

यापुढे जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं, तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचूनच यावं, असा सज्जड इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

राणा दाम्पत्याने मुंबई मध्ये मातोश्रीच्या समोर येऊन श्रीहनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर शिवसैनिक आक्रमक झाले. राणा दाम्पत्य गनिमी काव्याने मुंबईत दाखल देखील झाले. परंतु, मातोश्री आणि त्यांच्या मुंबई येथील घराबाहेर शिवसैनिकांनी एवढी गर्दी असल्याने त्यांना घरातून बाहेर पडणे देखील मुश्कील बनले होते. त्यामुळे जनतेला होणारा त्रास, पंतप्रधनांचा नियोजित दौरा आणि मुंबईतील पोलिसांची सुरक्षा व्यवस्थेसाठी झालेली अवस्था पाहता त्यांनी आपला मातोश्रीवर जायचा निर्णय मागे घेतला.

सत्ता असेल नसेल आम्हाला पर्वा नाही, तुमचा जीव तडफडतोय सत्तेशिवाय,  स्वत:ची हिम्मत नाही पुढे येऊन लढण्याची म्हणून काही शिखंडींना पुढे करायचं आणि त्यांच्या आडून आमच्यावर हल्ले करायचे, त्या शिखंडीच्या आडून जे हल्ले करतायत, त्यांचा लक्षभेद केला जाईल,  महाभारत नव्याने घडवण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

आम्ही अमरावतीत जातो, पाहू कोणाचं आहे अमरावती! यापुढे जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं, तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचूनच यावं, असा सज्जड इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे काही घंटाधारीं नाही आहे, आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही कायम हातात गदा घेतली आहे, तलवार घेतली आहे आणि गरज पडली तेव्हा अयोध्येत हातोडाही घेतला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कृपा करुन शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका आणि मातोश्रीशी छेडछाड करु नका, नाहीतर २० फूट खाली गाडले जाल, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular