27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeIndiaलता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.

या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचं हे प्रथम वर्ष आहे. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्रॉफ आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना देखील या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत क्षेत्रातील कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने संगीत, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता, समाजसेवा, रंगभूमी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मंगेशकर कुटुंबीयांकडून हा पुरस्कार प्रदान केला जातो.

यंदा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. प्रतित समधानी,  डॉ. अश्विन मेहता,  डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ कवी गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ गायिका संगीतकार मीना खडीकर, ज्येष्ठ गायिका संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular