26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeMaharashtraकोल्हापूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी

कोल्हापूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आज कोल्हापूरमध्ये उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीकडून दिवंगत नेते चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी काँग्रेसच्या जयश्री पाटील रिंगणात आहेत, भाजपकडून सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सभेच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सभा घेतल्या. यावेळी अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण २ हजार १४२ कर्मचारी नियुक्त करण्यता आले आहेत. तर मतरारांच्या सेवेसाठी ३५७ ईव्हीएम मशीन द्वारे ही प्रक्रिया पार पडत आहे. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अटीतटीचा सामना असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पाकिटातून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपच्या ५ कार्यकर्त्यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८६ हजार ३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मंगळवार पेठ, सुतारवाडा व वारे वसाहत परिसरात पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने शहरात खळबळ उडाली ताब्यात घेतलेल्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.

महाविकास आघाडी आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदानाला सुरुवात झाली. प्रचारासाठी दोन्ही बाजूंनी उतरलेल्या नेत्यांच्या फौजा आणि आरोप-प्रत्यारोपाच्या धुरळ्याने कमालीच्या गाजलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात चुरस दिसून येत आहे

RELATED ARTICLES

Most Popular