27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeEntertainmentएका रात्रीत नाहीसं झालेलं गाव आधारित, “एक होतं माळीण” चित्रपट

एका रात्रीत नाहीसं झालेलं गाव आधारित, “एक होतं माळीण” चित्रपट

ना घर, ना तिथे कुटुंबातील सदस्य होते. होती ती केवळ डोंगराची ढळलेली माती.

२०१४ सालामध्ये जुन्नर तालुक्यातील माळीण गावामध्ये अतिवृष्टीमुळे डोंगरावरची जमीन घळून दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. पूर्णच्या पूर्ण डोंगर पायथ्याशी असलेल्या गावावर कोसळल्याने सर्व गाव गाडले गेले होते. आणि पावसाचा मारा सुरूच असल्याने कोणाला कळले देखील नव्हती हि बातमी. जेंव्हा त्या गावातील बाहेर गेलेली माणस परत गावात आली तर तिथली परिस्थिती अतिशय गंभीर होती. ना घर, ना तिथे कुटुंबातील सदस्य होते. होती ती केवळ डोंगराची ढळलेली माती. याच सत्य दुर्घटनेवर आधारित एक होतं माळीण या चित्रपटातून ती घटना २९ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.

या चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी केली आहे. तर रुपेश राणे, अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी केले आहे.

मुसळधार पावसामुळे संपूर्ण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. त्या गावाचे पुनर्वसन करायला देखील बराच कालखंड गेला. एक संपूर्ण गावच एका रात्रीत नाहीसं झालं होतं. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हळूवार आणि हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी भेट घेऊन प्रत्यक्ष संवाद साधून,  त्यांच्याकडून माहिती घेऊन नव्याने कथानक लिहिलं गेलं आहे.

प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, अभिजित श्वेतचंद्र, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. छायांकन राजा फडतरे यांनी तर गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन युवराज गोंगले यांनी केलं आहे. दिवाकर घोडके यांचे व्हीएफएक्स असून कार्यकारी निर्माते म्हणून महेश भारंबे काम पहात आहेत. मराठी चित्रपटात उत्तमोत्तम कथा असलेले चित्रपट येत असतात. त्यात आता एक होतं माळीण या चित्रपटाचीही भर पडणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular