24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeMaharashtraदिवंगत नेते विनायक मेटे मृत्यू प्रकरणी, चालकावर गुन्हा दाखल

दिवंगत नेते विनायक मेटे मृत्यू प्रकरणी, चालकावर गुन्हा दाखल

सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात १२० ते १४० च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मोटे चालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे.

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालक एकनाथ कदम याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२  रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. त्यानुसार चौकशीअंती चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघातास्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर, आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आलं होतं. सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात १२० ते १४० च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. सीआयडीच्या तपासात हे सत्य समोर आल आणि त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular