23.3 C
Ratnagiri
Monday, February 6, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraसिलिंडर फसवणुक रोखण्यासाठी, अद्ययावत क़्युआर कोडची मदत

सिलिंडर फसवणुक रोखण्यासाठी, अद्ययावत क़्युआर कोडची मदत

आता LPG गॅस सिलेंडरवर QR कोड असेल यात सिलिंडरचे वजन आणि एक्सपायरी यांचा संपूर्ण इतिहास असेल.

सध्या देशभरात सुमारे तीस कोटी घरगुती एलपीजी ग्राहक आहेत. यापैकी एकट्या IOCL चे सुमारे १५ कोटी ग्राहक आहेत. ३०० दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे ५० टक्के ग्राहकांकडे दोन सिलिंडर आहेत. गॅस सिलिंडर बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. यामुळे गॅस सिलिंडर पासून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. आता LPG गॅस सिलेंडरवर QR कोड असेल यात सिलिंडरचे वजन आणि एक्सपायरी यांचा संपूर्ण इतिहास असेल. हे सर्व ३ महिन्यांत सुरू होईल. या QR कोडमध्ये गॅस सिलिंडरशी संबंधित सर्व माहिती असेल.

यामुळे सिलिंडर फसवणुकीचे प्रमाण रोखण्यास मदत होईल. हे QR कोड नवीन आणि जुन्या दोन्ही सिलिंडरवर लागू केले जातील. जुन्या गॅस सिलेंडरवर क्यूआर कोडचे मेटल स्टिकर वेल्डेड केले जाईल. नवीन गॅस सिलेडरवर आधीच QR कोड असेल.

क्यूआर कोडच्या मदतीने घरगुती एलपीजी ग्राहकांना त्यांच्या घरी येणारा एलपीजी सिलिंडर कोणत्या प्लांटमध्ये बाटलीबंद करण्यात आला हे सहज कळू शकेल, त्याचे वितरक कोण आहे?  इंडियन ऑइलचे म्हणणे आहे की हा QR कोड एक प्रकारे प्रत्येक LPG सिलेंडरचे आधार कार्ड असेल. यामुळे एलपीजी सिलिंडरची बाटलीबंद करण्यापासून ते वितरणापर्यंतची प्रक्रिया पारदर्शक होईल.

विशेष म्हणजे, घरांमध्ये वापरले जाणारे एलपीजी सिलिंडर बीआयएस ३१९६ मानकांच्या आधारे बनवले जातात. या सिलेंडरचे आयुष्य १५ वर्षे आहे. एलपीजी सिलिंडरची चाचणी या काळात दोनदा केली जाते. पहिली चाचणी सिलेंडरची५ वर्षे पूर्ण झाल्यावर आणि दुसरी चाचणी १० वर्षे पूर्ण झाल्यावर केली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular