25.8 C
Ratnagiri
Sunday, September 15, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriलव्ह जिहाद विरोधात कायदा करा ! रत्नागिरीमध्ये जोरदार निदर्शने

लव्ह जिहाद विरोधात कायदा करा ! रत्नागिरीमध्ये जोरदार निदर्शने

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकत्र्यांनी घोषणा देवून ठरण घटनेचा निषेध केला.

लव्ह जिहाद कायदा लागू झालाच पाहिजे. यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला फाशीच झालीच पाहिजे… ‘अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत हिंदू जनजागरण समितीच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही निदर्शने करण्यात आली. लव्ह जिहाद कायदा लागू झालाच पाहिजे या मागणीसाठी मंगळवारी हिंदू जनजागरण समितीच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी उरण येथे यशश्री शिंदेच्या अमानुष हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करुन दाऊद शेख या. आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच लव जिहाद कायदा तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकत्यांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकत्र्यांनी घोषणा देवून ठरण घटनेचा निषेध केला.

RELATED ARTICLES

Most Popular