25.8 C
Ratnagiri
Sunday, September 15, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRajapurबिबट्याच्या बछड्याची आईशी घडवणार पुनर्भेट, वनविभागाचे प्रयत्न सुरू

बिबट्याच्या बछड्याची आईशी घडवणार पुनर्भेट, वनविभागाचे प्रयत्न सुरू

मात्र, त्या परिसरामध्ये त्या कालावधीमध्ये मादी फिरकलेली नाही.

तालुक्यातील येरडव पाटीलवाडी येथील किसन दळवी यांना जंगलाजवळील परिसरात बिबट्याचा सुमारे पाच ते सहा दिवसांचा बछडा आढळला आहे. त्या बछड्याची आईबरोबर (बिबट्या मादी) पुनर्भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने रात्रभर केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे आता बछड्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाचल परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. जंगल परिसरासह लोकवस्तीच्या परिसरामध्येही काहीवेळा बिबट्या लोकांना दिसल्याचे सांगितले जाते. अशातच येरडव पाटीलवाडी येथील किसन बछडा दळवी यांना बिबट्याचा सापडल्याची माहिती तुषार पाचलकर यांच्याकडून वनविभागाला रविवारी (ता. ११) मिळाली.

याबाबतची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी यांना कळवून राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी किसन दळवी यांच्याकडून बिबट्याचा बछडा ताब्यात घेतला. ही मादी ७ दिवसांची आहे. विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बछड्यास मादीला मिळवण्याचे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे,

लांजा वनपाल दिलीप आरेकर, राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार, वनरक्षक कांदळवन किरण पाचार्णे, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, नीलेश म्हादये आदींनी वनविभागाकडून प्रयत्न चालू केले. ज्या ठिकाणी बछडा सापडला होता त्या ठिकाणी पहाटेपर्यंत ठेवून बछड्याला पुन्हा त्याच्या आईला भेटविण्याचे वनविभागाकडून प्रयत्न करण्यात आले; मात्र, त्या परिसरामध्ये त्या कालावधीमध्ये मादी फिरकलेली नाही. त्यामुळे पुन्हा बछड्याला ताब्यात घेऊन वनविभागाने पशुधन विकास अधिकारी प्रभात किनरे यांच्याकडून त्याची तपासणी करून घेतली. त्यामध्ये बछडा सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES

Most Popular