26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeChiplunखाडीत सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीचा शोध सुरू

खाडीत सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीचा शोध सुरू

या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक भूमिका घेतली आहे.

सीईटीपीऐवजी नाल्यात सोडणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयाने सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी लोटे औद्योगिक वसाहत ते कोतवली खाडीपर्यंतच्या नाल्याची तपासणी करताना तेथील पाण्याचे तसेच संशयित कारखान्यातून बाहेर पडलेल्या सांडपाण्याचे नमुने घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे. लोटे एमआयडीसीतील अनेक कारखान्यांच्या बाजूने वाहणारा आणि मुंबई-गोवा महामार्ग ओलांडून सीईटीपीच्या बाजूने पुढे कोतवलीला मिळणाऱ्या नाल्यात सोमवारी लालसर सांडपाणी अज्ञात कारखानदाराने सोडले.

त्यामुळे हा नाला लालसर रंगाच्या सांडपाण्याने ओसंडून वाहू लागला. यामुळे स्थनिक ग्रामस्थ, मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेऊन या संदर्भातील तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीईटीपी यांच्याकडे केली. यानंतर हे नाल्यातील सांडपाणी असल्याचे सांगत सीईटीपीने हात वर केले तर अधिकाऱ्यांनी संपूर्ण नाल्याची तपासणी केली. या वेळी तेथील पाण्याचे नमुने घेताना मच्छीमार व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चाही केली. याचबरोबर औद्योगिक वसाहतीतील नाल्यात जेथून सांडपाणी आले त्या एका संशयित कारखान्याच्या लगतच्या नाल्यातील पाण्याचे नमुनेही घेतले आहेत. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक भूमिका घेतली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular