25.6 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurविहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, नैसर्गिक अधिवासात सोडले

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, नैसर्गिक अधिवासात सोडले

बिबट्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये जाण्यासाठी पाच तास ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम सुरू होती.

वन्यप्राणी नैसर्गिक अधिवास सोडून मनुष्यांच्या वाडी वस्तीत यायला लागले आहेत. वाघ आणि बिबट्यांचा खुलेआम वावर अनेक ग्रामीण आणि शहरी भागाच्या ठिकाणी सुद्धा झालेला दिसून येत आहे. अनेक वेळा भुकेसाठी ते वन्यजीव मानवी वस्तीत शिरायला लागले आहेत. भूकेपाई ते मनुष्य आणि पाळीव प्राण्यांवर सुद्धा हल्ले करायला लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागाच्या आसपास जिथे जंगलयुक्त परिसर असेल त्या ठिकाणी, या वन्य पशूंचा वावर वाढला आहे.

राजापूर तालुक्यातील खिणगिणी कदमवाडी येथील ग्रामस्थ प्रभाकर कदम यांच्या विहिरीत बुधवारी  भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटया पडला. याबाबतची माहिती दूरध्वनीवरून मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये, प्रथमेश म्हादये यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढत पिंजऱ्यात जेरबंद केले. भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून जीवदान दिले.

बिबट्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये जाण्यासाठी पाच तास ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम सुरू होती. त्याला जेरबंद केल्यावर त्याची तपासणी करण्यात आली. सुमारे पाच वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या असून त्याची लांबी १७७ सेमी तर उंची ६१ सेमी इतकी आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. पण वन्यपशूंच्या मानवी वस्तीतील वाढत्या वावरामुळे चिंतेचे आणि सोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular