27.5 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriकोकण कलिफोर्नियापेक्षा सरस करुः पालकमंत्री डॉ. उदय सामंत

कोकण कलिफोर्नियापेक्षा सरस करुः पालकमंत्री डॉ. उदय सामंत

बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात ही कार्यशाळा होत आहे.

कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहे. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले – असल्याने, मोठ्या प्रमाणावर बदल दिसत आहे. कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करु, जेणेकरुन कोकण पहायला परदेशी पर्यटक येतील. कोकणची सरसता आणि समृद्धता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दि. ३१ मे व १ जून २०२५ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ही कोकणाने जन्माला घातली आहे.

बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात ही कार्यशाळा होत आहे. आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलेले आहे. माझ्या ३० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत माझे काम जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम हे पत्रकारांनी केले आहे. हे माझ्या अपरोक्ष पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहेत. त्यामुळे मला पत्रकारांबद्दल आत्मियता आहे. कोकणचा विकास संपूर्ण महाराष्ट्राने पहावा, त्याची प्रसिध्दी करावी. या माध्यमातून परदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी यावे, यासाठी अशी कार्यशाळा राज्यभरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री डा सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत पुढे म्हणाले, समाज माध्यम ांमूळे मोठमोठ्या घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते.

हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगलं काम करुन घेण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते. कोकणातील पत्रकारितेमध्ये वेगळी क्षमता आहे. कोकणातील पत्रकारांना बाळशस्त्री जांभेकर, लोकम ान्य टिळकांचा वारसा आहे. यावेळी ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागुल, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular