26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRajapurवीज व्यवस्थेतील सुधारणांसाठी विस्तृत अहवाल द्या; आ. किरण सामंत

वीज व्यवस्थेतील सुधारणांसाठी विस्तृत अहवाल द्या; आ. किरण सामंत

शहरासह ग्रामीण भागातील विज समस्येबाबत माहिती घेतली.

पावसाळ्यात अखंडीतपणे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासौठी नियोजन करून त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री व करावयाच्या उपाययोजनांचा विस्तृत अहवाल आपल्याला द्या, अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारच्या बैठकीत दिल्या. शासकीय विश्रामधाम येथे ही बैठक झाली. बैठकीला उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर व विविध भागांचे अभियंते उपस्थित होते. मतदारसंघातील ‘महावितरणच्या एकूणच नवीन व सुधारणात्मक काम ांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकारातून आवश्यक निधी उपलब्ध करून देताना दोन्ही तालुक्यातील वीज यंत्रणा अधिक भक्कम करण्यावर व खंडीत विजपुरवठयाचा प्रश्न कायम स्वरूपी कसा निकाली काढता येईल यावर आपला भर रहाणार असल्याचेही आ. सामंत यांनी यावेळी नमूद केले. पावसाळयात विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर अपुरा कर्मचारी वर्ग व अन्य अडचणींतुन महावितरणचे अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत याची आपणाला कल्पना आहे.

पण वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर ग्राहक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांचे फोन येत असतील ते स्वीकारून निदान जी काही अडचण आहे, खंडीत लाईट कधी येईल याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी अशा सक्त सूचनाही आ. सामंत यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. राजापूर शहरासह ग्रामीण भागातील विजपुरवठा मान्सूनपूर्व पावसातच कोलमडला आहे. अनेक भागात सतत वीज खंडीत होत असून महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून योग्य प्रकारे माहिती दिली जात नसल्याच्या जनतेच्या तक्रारी होत्या. या प्रश्नी भाजपा युवा कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी आ. सौमंत यांच्याशी चर्चा करून या बैठकीचे आयोजन करून राजापूरकरांच्या वीज समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली होती. त्यावर आ. सामंत यांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत आ. सामंत यांनी शहरासह ग्रामीण भागातील विज समस्येबाबत माहिती घेतली. यावेळी पोल, व ट्रान्स्फार्मर बदलणे, लाईनमेन नेमणे यांसह अन्य तक्रारी पुढे आल्या. तर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांचा मुद्दाही मांडण्यात आला. यावेळी अनेकांनी आपले प्रश्न मांडले. यानंतर आ. सामंत यांनी अधिकाऱ्यांना जी कामे आता तातडीने करणे शक्य आहेत ती करण्याच्या सूचना केल्या. तर भविष्यात विजेचा प्रश्न कायमस्वरूपी कशा पध्दतीने निकाली काढता येईल, यासाठीचे नियोजन करून अहवाल द्या, आपण त्यासाठी शासनाकडून निधी आणून ती कामे मार्गी लावू, अशा सूचना दिल्या. या बैठकीला महावितरणचे अधिकारी क्षिरसागर यांसह सर्व विभागाचे अधिकारी, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजु, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख सौरभ खडपे, महिला नेल्या हर्षदा खानविलकर, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर, उमेश पराडकर, माजी जि. प. सदस्य आबा आडीवरेकर आदींसह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विजग्राहक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular