27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

चिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना शहरातील सखल भाग...

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...
HomeRatnagiriअनेक ग्रंथालये अनुदानाच्या प्रतीक्षेत

अनेक ग्रंथालये अनुदानाच्या प्रतीक्षेत

वाचाल तर वाचाल. हे आपल्याला सर्वज्ञात आहे. विविध शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त अधिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी ग्रंथालयाची व्यवस्था केलेली असते. ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची, विविध विषयावरील, विविध वर्गीकरणाची पुस्तके उपलब्ध असतात. ग्रंथपाल सुद्धा विद्यार्थ्याना अधिकाधिक ज्ञान मिळावे यासाठी कायम प्रयत्नशील असतात.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारण ८० ग्रंथालये आहेत, राज्यात एकूण १२ हजार १४९ सार्वजनीक ग्रंथालये आहेत. त्यामध्ये कार्यरत असणारे एकूण २१ हजार ६१३ कर्मचारी आहेत. राज्यातील ग्रंथालयांचे २०२०-२१ आर्थिक वर्षाचे अनुदान अजूनही मिळालेले नाही. मागील वर्षीचा दुसरा हफ्ता अजूनही थकीत आहे, जर शासनाचे धोरण असेच राहिले तर ग्रंथालय चालविणे कठीण होऊन जाणार आहे.

शासनाने जर वेळेमध्ये अनुदान पुरविले नाही तर क वर्गाची ग्रंथालये बंद पडण्याची भीती जेष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. अनेक ग्रंथालये भाड्याच्या जागेमध्ये असून, प्रत्येक महिन्याला येणारे जागेचे भाडे, बिल, कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार इतर आवश्यक सुविधा यासाठी लागणारा पैसा आणायचा कोठून ? अनुदान नसल्याने ग्रंथालय चालविणे कठीण झाले आहे. काही ग्रंथालयांनी या खर्चाच्या कारणास्तव वृत्तपत्रे आणि मासिके देखील बंद केली आहेत.

ग्रंथपालांचा असणारा तुटपुंजा पगार सुद्धा शासन वेळेवर देत नसेल तर अशा कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कसे जगावे? जर एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी कसा उदरनिर्वाह करायचा? ग्रंथालय चालकांकडून  वारंवार पाठपुरावा करून सुद्धा, अनुदानाची फाईल अर्थ खात्याकडे पाठवली असून, तेथे मंजूर झाली कि अनुदार जमा होईल असे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular