28.1 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriसाई हॉस्पिटलचा परवाना रद्द, आरोग्य विभागाची कारवाई

साई हॉस्पिटलचा परवाना रद्द, आरोग्य विभागाची कारवाई

हॉस्पिटलमध्ये गोळ्या व गर्भपात करण्यासाठी आवश्यक साहित्य आढळून आले.

गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्याप्रकरणी टीआरपी येथील साई हॉस्पिटलवर कारवाई झाली. या प्रकरणी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनंत नारायण शिगवण यांच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा बेकायदेशीर प्रकार उघडकीस आल्यामुळे चौकशी करून जिल्हा आरोग्य विभागाने या हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी ही माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली. त्यासाठी डमी महिला रुग्ण पाठवण्यात आली होती.

त्या महिलेवर या रुग्णालयात उपचार सुरू केले. गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या रुग्णांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शुक्रवारी (ता. २६) रात्री १० च्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी ग्रामीण पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाला सोबत घेऊन साई हॉस्पिटलवर छापा टाकला. यावेळी साई हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व गर्भपात करण्यासाठी आवश्यक साहित्य आढळून आले. वैद्यकीय पथकासह ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून गोळ्या, साहित्य जप्त केल्या.

डॉ. भास्कर जगताप यांनी दिलेल्या कारीवरून, पोलिसांनी डॉ. अनंत शिगवण च्याविरुद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा केल्याप्रकरणी डॉ. शिगवण च्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. अनेक डॉक्टर आता आरोग्य विभागाच्या रडारवर आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी केली. या हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular