मुंबईची लाईफलाईन म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आता फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्ये सुमारे ५० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यासोबतच रेल्वेकडून प्रवाशांसाठी मिळालेली दुसरी आनंदाची बातमी म्हणजे काही दिवसांपूर्वच रेल्वे प्रशासनानं एसी लोकलच्या भाड्यामध्ये देखील कपात केली होती.
एसी लोकलच्या तिकीट दराम्ध्ये तब्बल ५० टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्यानंतर आता रेल्वेने फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्ये कपात करत दुसरी मोठी भेट दिली आहे. आज रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी मुंबईत या बाबतीतील मोठी घोषणा केली आहे. मुंबईकरांची लाखो नागरिक रोज लोकलने प्रवास करतात. त्यामुळे एसी लोकलच्या तिकीट बरोबरच फर्स्ट क्लासचे तिकीट दर देखील कमी झाल्यानं मुंबईकरांना खूपच दिलासा मिळाला आहे.
तिकीटमध्ये जरी कपात झाली असली तरी, एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नाही, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर आता आहेत तेच राहणार आहेत. सध्या फर्स्ट क्लासचं ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे फर्स्ट क्लासचे तिकीट १४० रुपये असून, मासिक पासची किंमत ७५५ रुपये इतकी आहे. रेल्वेच्या तिकीट दरामधील कपातीच्या मोठ्या निर्णयानंतर १४० रुपयांचं तिकीट दरामध्ये आता ८५ रुपयांपर्यत म्हणजे सुमारे ५० टक्के कमी होणार आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ही मोठी घोषणा केली आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी लोकलही सुरु केली होती. मात्र, एसी लोकलच्या महागड्या भाड्यामुळे प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास परवडत नव्हता. यामुळे एसी लोकलला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी केली. आता अखेरीस प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे. एसी लोकलच्या भाड्यातही ५० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे आता एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास ६५ ऐवजी आता केवळ ३० रुपयांमध्ये करता येणार आहे.