25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeKhedरत्नागिरी-खेड महामार्गावर बोलेरो व ट्रकचा अपघात, दोघे जागीच गतप्राण

रत्नागिरी-खेड महामार्गावर बोलेरो व ट्रकचा अपघात, दोघे जागीच गतप्राण

रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघातांच्या मालिका सुद्धा वाढू लागल्या आहेत.

सध्या सर्वत्र आंब्याचा मोसम सुरु झाला असून, अनेक खाजगी वाहने विक्रीसाठी मुंबई, पुणे विविध ठिकाणी मालाची पोहोच करण्यासाठी रस्त्यावरून धावताना दिसतात. कोकणातील आंब्याची लज्जतच न्यारी असल्याने रत्नागिरी आणि देवगड हापूसची विक्री हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात होते. परंतु, रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघातांच्या मालिका सुद्धा वाढू लागल्या आहेत.

रत्नागिरी-खेड येथे बोलेरो व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये देवगड तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास भोगाव संत तुकाराम मंदिरशेजारी देवगडकडून मुंबई- वाशीच्या दिशेने जाणारी बोलेरो पिकअप व जयगडहून ठाणे-मुंबईकडे जाणारा ट्रक यामध्ये समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला.

या अपघातात देवगड तालुक्यातील तुषार प्रकाश चव्हाण वय २४, रा. नारिंग्रे व नीलेश मनोहर शेट्ये वय ३७, रा. मुणगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश उत्तम कोयंडे वय २४, देवगड याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नारिंग्रे येथील तुषार चव्हाण हा अविवाहित आहे. तर मुणगे येथील नीलेश शेट्ये हा विवाहित असून त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. तुषार व नीलेश याच्या अपघाताची बातमी सकाळी गावात समजताच नारिंग्रे व मुणगे गावावर शोककळा पसरली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. मुंबई वाशी येथे बोलेरो पीकअप देवगड येथून आंबे घेवून जात होती. घटनास्थळी वाहनांची अवस्था पाहूनच भीषणता लक्षात येते.

RELATED ARTICLES

Most Popular