27.5 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

iPhone 16 मालिका विक्री सुरू, 5000 रुपयांची झटपट सूट…

Apple iPhone 16 मालिका अधिकृतपणे आजपासून म्हणजेच...

ऋषभ पंतने एमएस धोनीला बांगलादेशविरुद्ध केलेल्या कारवाईची आठवण करून दिली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना...
HomeKhedखेडमधील लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द

खेडमधील लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द

अचानक फेऱ्या रद्द केल्यामुळे त्यांची गैरसोय झाली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आंदोलनात एसटी बसची जाळपोळ तसेच तोडफोडीच्या घटना घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने लांबपल्ल्याच्या एसटी बसफेऱ्या रह करण्याचा निर्णय घेतला आहे. खेड येथून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या गुरुवारी (ता. २) सकाळी सात वाजल्यापासून रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. एसटीकडे सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून पाहिले जाते. दररोज हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे प्रवाशांची बसस्थानकात लगबगदेखील वाढलेली आहे; मात्र मराठा आंदोलनामुळे लालपरीची सेवा कोलमडली आहे.

प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. खेडमधून आज सकाळी सुटणारी खेड-आंबेजोगाई, खेड -पुणे, खेड- लातूर यासह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आंदोलक आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे महाड-माणगाव या ठिकाणी मुंबई- गोवा महामार्गदेखील रोखण्यात आला असल्याची माहिती खेड बसस्थानकात प्राप्त झाल्याने तत्काळ मुंबई-पुणेकडे जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिवाळी जवळ आल्यामुळे अनेकजण खरेदीसाठी मुंबईला जातात. अचानक फेऱ्या रद्द केल्यामुळे त्यांची गैरसोय झाली. काहींनी रेल्वेचा पर्याय निवडला तर काहींनी खासगी बसेसकडे मोर्चा वळवला. काहींनी परजिल्ह्यात जाणेच रद्द केले. याचा फटका जसा प्रवाशांना बसला तसे एसटीचे आर्थिक नुकसानही झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular