26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeKhedअखेर “ते” चोरटे मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

अखेर “ते” चोरटे मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स प्रा.लि कंपनीमध्ये ९ जुलै २०२२ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती.

खेड मधील लोटे एमआयडीसी येथील पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स प्रा.लि युनिट कंपनीत चोरी करणार्‍या चोरट्यांना जेरबंद करण्यात खेड पोलिसांना कारवाई यश आले आहे. त्यांच्या कडून ७ लाख ७० हजार ९० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

सोहम संतोष आंब्रे वय २१, साबिर शेख वय २१, अजिंक्य अजित आंब्रे वय २४, ॠतीक रामदास आंब्रे वय २२, दर्शन दिलीप गायकवाड वय २१, दिवेश आंब्रे वय २१, सर्व रा.खेड,रत्नागिरी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत विकी बालाजी सुर्यवंशी वय २९, रा.मुळ रा.लातूर सध्या रा.खेड,रत्नागिरी यांनी खेड पोलिसांकडे तक्रार दिली होती.

त्यानूसार, त्यांच्या पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स प्रा.लि कंपनीमध्ये ९ जुलै २०२२ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. या प्रकरणी तपास करताना पोलिस निरिक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु अरण्यात आला होता. तेव्हा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग,अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद, खेड पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.बी.कदम करत आहेत. तसेच हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, पोलिस शिपाई रुपेश जोगी, विनायक येलकर,विशाल धाडवे, सुनिल पडळकर व चालक पोलिस शिपाई रोहित जोयशी यांचा विशेष सहभाग होता.

RELATED ARTICLES

Most Popular