22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRajapurराजापुरात लम्पीने सहा जनावरे मृत्युमुखी

राजापुरात लम्पीने सहा जनावरे मृत्युमुखी

१६ जनावरे उपचाराअंती बरी झाली असली तरी अद्यापही ४१ जनावरे लम्पी आजाराने आजारी आहेत.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या आणि जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराने तालुक्यामध्ये पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अनेक गावांमधील जनावरांना लम्पी आजाराचा संसर्ग झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, तर लम्पी आजार झालेली १६ जनावरे उपचाराअंती बरी झाली असली तरी अद्यापही ४१ जनावरे लम्पी आजाराने आजारी आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराचा संसर्ग वाढू लागला होता.

या काळामध्ये तालुक्यातील दीडशेहून अधिक गुरांना लम्पी आजाराचा संसर्ग झाला होता. लम्पी आजाराला प्रतिबंध करणारी लसही टोचण्यात आली. तालुक्यामध्ये लम्पी आजार काहीसा आटोक्यात आला होता. विविध भागांतील गावांमधील ६७ जनावरांना गेल्या काही दिवसांमध्ये लम्पी आजार झाला आहे. लम्पी आजाराच्या अनुषंगाने जनावरांना लसीकरण करण्यासह अन्य विविध उपाययोजना, उपचार करण्यावर पशुवैद्यकीय विभागाने भर दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांनीही लम्पी आजाराचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जनावरमालकांना भरपाई – लम्पी आजाराचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसानभरपाईपोटी साहाय्य म्हणून अनुदान दिले जात आहे. त्यामध्ये गायीला ३० हजार, बैलाला २५ हजार आणि लहान वासराला १६ हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. लम्पी आजाराचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या २० जनावरांच्या मालकांना अनुदान प्राप्तीसंबंधित शासनाकडे पशुविभागाकडून प्रस्ताव सादर केले जातात. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे लम्पी आजाराने होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular