21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeMaharashtraप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

'ययाती आणि देवयानी' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं.

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले असून नागरिकांकडूनही अशोकमामांना पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.

त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच पांडू हवालदार या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला.

अशोक सराफ यांनी नाटकांत काम करावं असं त्यांच्या वडिलांना वाटत नव्हतं. त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी असं अशोक सराफ यांच्या वडिलांना वाटत होतं. ज्यानंतर अशोक सराफ बँकेत काम करत होते. पण नाटक काही सुटलं नाही. त्यानंतर अशोक सराफ यांना जशी बक्षीसं मिळू लागली तसा त्यांच्या वडिलांचा विरोध मावळला. त्यांच्या लक्षात आलं की खूप चांगला अभिनय आपला मुलगा करतो आहे. त्यामुळे त्यांनी नंतर विरोध केला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular