26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriआपल्यासमोर कोणी शेठ चालत नाही, नीलेश राणेंचा भास्कर जाधवांवर निशाणा

आपल्यासमोर कोणी शेठ चालत नाही, नीलेश राणेंचा भास्कर जाधवांवर निशाणा

गोशाळेच्या जुन्या वादाचा मुद्दा पकडून आपल्यासमोर कोणी शेठ चालत नाही.

कोकणात राणे व भास्कर जाधव हा वाद जुना आहे. राणे व जाधव एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोटे येथे झालेल्या कार्यक्रमात नीलेश राणे यांनी आमदार भास्कर जाधवांना लक्ष्य केले. गोशाळेच्या जुन्या वादाचा मुद्दा पकडून आपल्यासमोर कोणी शेठ चालत नाही. सगळ्यांचे गेट बंद. सोडणार नाही, असे सांगून आमदार जाधवांचे नाव न घेता त्यांच्यावर राणेंनी निशाणा साधला. यामुळे आगामी काळात पुन्हा राणे व जाधव यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे. लोटे येथील गोशाळेत भगवान कोकरे महाराज यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय गो संमेलनास केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनी हजेरी लावली होती.

केंद्रीय मंत्री राणे यांनी आमदार जाधवांवर बोलणे टाळले; मात्र नीलेश राणे यांनी आमदार जाधवांना पुन्हा एकदा डिवचले. नीलेश राणे म्हणाले, “कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका. अचानकपणे हे माझ्याकडे आले आणि सांगितले की, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्यांना मी एकत्र करतो. त्यानंतर एका मोठ्या वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमाला मला इथे बोलावलं तसेच कधी एक रुपयाची मागणीही केली नाही. या माणसाने मोठ्या धाडसाने गोशाळा उभी केली. भगवान कोकरे महाराज गोसेवा करत आहेत त्यांना मदत नाही करायची तर कोणाला करायची ?

तुम्हाला हवंय काय जमीनच ना? नाही देत जा, असे भास्कर जाधवांना उद्देशून नीलेश राणे म्हणाले, ही जमीन गाईंसाठी आहे. गाईंच्या रक्षणासाठी आहे. ती इतर कोणत्याही कामासाठी जाऊ देणार नाही. तशी मागणीही आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे प्रस्तावही गेले आहेत म्हणून कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका, कोणी शेठ आपल्यासमोर चालत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular