32.5 C
Ratnagiri
Thursday, April 18, 2024

अवकाळी पावसाची दापोलीत हजेरी

दापोली शहरासह तालुक्यात काल (ता.१५) रात्री अवकाळी...

कोकणची संस्कृती टिकवली विनायक राऊत

माझ्यावर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी गेल्या ३९...
HomeRatnagiriअखेर दोन वर्षानंतर “त्या” संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता

अखेर दोन वर्षानंतर “त्या” संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता

ही घटना १० ऑगस्ट २०१९ ला सायंकाळच्या सुमारास घडली होती.

रत्नागिरी शहराजवळील दोन वर्षापूर्वी घडलेली खुनाच्या घटनेच निकाल अद्यापही लागला नव्हता. तो अखेर लागला आहे. खेडशी येथील मोडा जंगलात बकऱ्या चरवण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या डोक्यात चिरा घालून निर्घुणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीची आज दोन वर्षानंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुरुवार दि. १७ला या खटल्याचा निकाल लागला. ही घटना १० ऑगस्ट २०१९ ला सायंकाळच्या सुमारास घडली होती.

सुरूवातीला अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एक वर्षानंतर संशयित आरोपीला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले होते. या खटल्यातील आरोपीची गुरुवारी दि. १७ न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. पोलीस संशयिताच्या मागावर असून, त्याचा कसोसीने शोध घेत होते. त्याचप्रमाणे, या हत्येच्या प्रकरणी विविध मार्गाने शोध घेऊन देखील हवे तसे सबळ पुरावे न मिळाल्याने अखेर कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.

निलेश उर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर वय ३५, रा. भंडारवाडी, खेडशी, रत्नागिरी असे आरोपीचे नाव आहे. खेडशी गावातील तरुणी मैथिली गवाणकर ही मोडा येथील जंगलात बकऱ्या चरवण्यासाठी गेली असता तिच्या डोक्यात चिरा घालून तिला ठार केले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. हे प्रकरण अनेक दिवस गाजत होते. मैथीलीच्या पालकांनी देखील या प्रकरणी कसून चौकशीची मागणी केली होती. परंतु, अखेर त्या संशयिताला रत्नागिरी कोर्टातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular