24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriमंडणगड आगाराच्या एसटीची अवस्था दयनीय, उपाययोजना करण्याची मागणी

मंडणगड आगाराच्या एसटीची अवस्था दयनीय, उपाययोजना करण्याची मागणी

नादुरुस्त असलेली वाहने घेऊनच चालकांना लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील प्रवाशांची सेवा करावी लागत आहे.

कोकणातून मुंबई, पुणे इतरत्र ठिकाणी बऱ्याच प्रमाणात एसटीची वाहतूक रोज सुरु असते. प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रवासी आधीपासूनच आरक्षण करून ठेवतात. परंतु, एसटी बसेसची झालेली अवस्था बघून अशा दयनीय अवस्थेतील बसमधून कसा प्रवास करणार असा प्रश्न पडू लागला आहे.

मुंबई व मंडणगड आगारातून विविध मार्गावर रोज अनेक गाड्या मार्गस्थ होतात. एसटी प्रशासनाने मात्र  प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला वाऱ्यावर सोडल्याचे चिन्ह दिसून येत आहे. नेहमीच गाड्यांच्या दर्जाबाबत प्रवाशांत नाराजी पाहायला मिळत आहे. अगदी चालकांनाही गाड्या चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. काही गाड्यांची अवस्था तर इतकी दयनीय झालेली आहे कि, मोडक्‍या खिडक्‍या, फाटक्या सीट, तुटकी दार, इंडिकेटरचा पत्ताच नसतो, ब्रेक लाइट सुरु होत नाहीत. अशा अनेक समस्या आगारातील गाड्यांच्या बाबतीत आहेत; पण त्याकडे महामंडळही दुर्लक्ष करत आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी” असे ब्रीदवाक्‍य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या या तालुक्यात धावणाऱ्या बसेस मोडक्‍या खिडक्‍या, काचा फुटलेल्या, तुटकी दारे, तुटलेल्या, फाटलेल्या सीट, पत्रे बाहेर आलेले, इंडिकेटरचा पत्ताच नाही, अशा अवस्थेमध्येच रस्त्यावर धावत आहेत. १५ डिसेंबरला मध्यरात्री सुटणारी मुंबई आगाराच्या मुंबई वेळास या गाडीने आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तुटलेल्या सीट मिळत असून हा लांब पल्ल्याचा प्रवास तापदायक ठरतो आहे. याचा अनुभव अनेकांना आला असल्याने प्रचंड नाराजी आहे.

तसेच मंडणगड आगाराने ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद केल्याने आगार फक्त गाडा हाकण्याचे काम करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. नादुरुस्त असलेली वाहने घेऊनच चालकांना लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील प्रवाशांची सेवा करावी लागत आहे. महामंडळाने गाड्यांची देखभाल दुरुस्ती चांगली करून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला महत्व देण्याची गरज आहे. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मंडणगड आगार व्यवस्थापनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular