27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriकेळवत घाटात विदेशी दारुची वाहतूक करणार्‍या

केळवत घाटात विदेशी दारुची वाहतूक करणार्‍या

रत्नागिरी मंडणगड तालुक्यातील केळवत घाटात विदेशी दारुची वाहतूक करणार्‍या एकाला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारू, सिगारेट, अमली पदार्थ, वन्य जीवांच्या अवयवाची तस्करी अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार छुप्या पद्धतीने सुरु आहेत. कोरोना काळापासून दारूचा सुरु असलेला काळा बाजार अद्यापही छुप्या पद्धतीने सुरूच आहे. पोलीस वेळोवेळी सतर्क राहून संबंधितांवर कारवाई करताना दिसत आहेत. परंतु तरीही दारूची अवैधरित्या विक्री हि सुरूच आहे.

रत्नागिरी मंडणगड तालुक्यातील केळवत घाटात विदेशी दारुची वाहतूक करणार्‍या एकाला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सुमारे १ लाख १० हजार ४० रुपयांची मुद्देमाल सापडून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश मालुसरे वय ४८,  मंडणगड हा बिगर परवाना विदेशी दारुची वाहतूक करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केळवत घाटात त्याला दारुच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २१३० रुपयांच्या मापाच्या टयूबर्ग बिअरच्या १२  बाटल्या,  ३७२० रुपयांच्या लंडन पिल्सनरच्या १४  बाटल्या, २१६०  रुपयांच्या किंगफिशरच्या १२ बाटल्या,  २५२०  रुपयांच्या किंगफिशरचे २४ टीन,  ७६८० रुपयांच्या मॅकडोल नं. १ व्हिस्कीच्या ४८ बाटल्या,  १८००  रुपये किंमतीच्या रोमानोव्ह व्होडकाच्या १० बाटल्या, आणि ९०  हजार रुपये किंमतीची इंडिगो गाडी असा एकूण १ लाख १० हजार ४०  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास चव्हाण करत आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीमुळे हा मुद्देमाल आणि अवैधरीत्या विक्री करणारा इसम सुद्धा ताब्यात मिळाला आहे. जिथे दारूचे सेवन करण्यासाठी परवाना लागतो तिथे अनेक वाहक काहीशा पैशाच्या लालसेपोटी अशी विना परवाना वाहतूक करण्यास तयार होतात आणि पकडले जातात.

RELATED ARTICLES

Most Popular