27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeIndiaकोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा

कोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा

भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या दिलेल्या आदेशानुसार कोकण रेल्वेमार्फत नेपाळ रेल्वे कंपनीला दोन डेमू संच ज्या एका संचामध्ये पाच बोगी असतात त्या वितरित केल्या आहेत.

भारत- नेपाळ या दोन देशातील दळणवळण यंत्रणा सक्षम बनवण्यासाठी त्याप्रमाणेच व्यापार आणि वाणिज्य संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेला मिळाली आहे. या मार्गावर चालवण्यात येणारे ‘डेमू’ रेक चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनविण्यात आले आहेत. जयनगर (बिहार) ते कुर्था (नेपाळ) या मार्गावर रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहो.

कोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. जयनगर बिहार ते कुर्था नेपाळ या मार्गावर दोन डेमू रेल्वेचा संच कोकण रेल्वे नेपाळला प्रदान करणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा नुकताच प्रारंभ झाला आहे. पुढील वर्षभर कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी काम करणार आहे. त्याचे उद्‌घाटन २ एप्रिलला झाले असून, जयनगर ते कुर्था मधील सीमेवर रेल्वेसेवा सुरु होणार आहे.

भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या दिलेल्या आदेशानुसार कोकण रेल्वेमार्फत नेपाळ रेल्वे कंपनीला दोन डेमू संच ज्या एका संचामध्ये पाच बोगी असतात त्या वितरित केल्या आहेत. सुरुवातीच्या प्रवासी सेवा दोन रेल्वे संचांसह सुरू केल्या जातील. नेपाळ सरकारने केलेल्या निधीतून ज्यांचा पुरवठा केला जाणार आहे. नेपाळच्या राष्ट्रीय ध्वजावर आधारित रंगसंगती या रेल्वेला देण्यात आली आहे. जयनगर-कुर्था विभागातील रेल्वे सेवा, रेल्वे प्रणालीचे संचालन आणि देखभालीसाठी नेपाळ सरकारने नेपाळ रेल्वे कंपनी लिमिटेडची स्थापना केली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी ही रेल्वे सेवा सुरू करत आहे.

नेपाळ रेल्वे कंपनीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला एक वर्षाच्या कालावधीत रेल्वे चालवण्यासह देखभालीसाठी नियुक्त केले आहे. या कराराचा एक भाग म्हणून, कोकण रेल्वेमार्फत गाडीचे संचालन आणि देखभाल होणार आहे. नेपाळ रेल्वेच्या कर्मचाऱ्‍यांनाही प्रशिक्षण देणार आहे. कोकण रेल्वे २६ तज्ज्ञ मनुष्यबळ आणि अद्ययावत उपकरणांचा पुरवठा करणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular