24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriजिल्ह्यातील “त्या” मृत रुग्णाच्या संपर्कातील २६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

जिल्ह्यातील “त्या” मृत रुग्णाच्या संपर्कातील २६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे धोरणानुसार तालुक्यात उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चौथ्या टप्प्यात आरोग्य विभागाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या पहिल्या संशयित कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर आरोग्ययंत्रणा अधिक सतर्कतेने काम कारत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या चौथ्या टप्प्याला सुरवात झाल्याने तालुक्यातील आरोग्ययंत्रणा सर्तक झाली आहे. मंडणगड मधील संशयित कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या संपर्कातील २६ जणांचे नमुने कोरोना चाचणीकरिता पाठवण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे धोरणानुसार तालुक्यात उपाययोजना सुरू झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात मास्कसह कोरोनाचे सर्व नियम तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये देखील शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे जनजीवन विशेषतः कोरोनामुळे विस्कटलेली अर्थकारणाची गाडी हळुहळू पूर्वपदावर येऊ लागलेली आहे. कोरोनामुळे मागील दोन पेक्षा अधिक काळ सर्वच बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली.

सध्याच्या आकडेवारीनुसार, तालुक्यातील ४१ हजार ४३८ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. ३३ हजार ७६४ नागरिकांना दुसरा डोस, ५४८४ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. तालुक्यात आजअखेर १३७१ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. यातील १३५३ कोरोनाबाधित नागरिक बरे झाले असून १८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बाहेरील देशात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे धुमाकूळ घातला असल्याने, भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्वच नागरिकांना सतर्क राहून काम करण्याची गरज असून कोरोनाच्या नवीन विषाणूचा जागतिक पातळीवर झपाट्याने प्रसार होत असल्याने नागरिकांना दुर्लक्ष न करता आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार वाटचाल करण्याचे निर्देश मिळत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular