24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriएक अजब चोरी, १० महिन्यांपासून पोलीस तक्रारच घेईना...!

एक अजब चोरी, १० महिन्यांपासून पोलीस तक्रारच घेईना…!

चोरीस गेलेल्या जनावरांची किंमत ३८  हजार रुपये होती. परंतु याबद्दल फिर्याद देण्यात आली असता, ती घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते.

रत्नागिरी तालुक्यातील चांदोर तळीवाडी येथे घरापासून दूर असलेल्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या गाई-शेळ्यांची चोरी झाली आहे. प्रथम ही घटना फेब्रुवारी २०२२ मध्ये घडली होती; मात्र या विरोधात पोलीस तक्रारच घेईनात, अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर वरीष्टांची भेट घेतल्या नंतर १० महिन्यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात घेतली. गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस टाळाटाळ करत होते; मात्र भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे या विषयी तक्रार दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

घडलेली घटन अशी कि, सखाराम भन्या कोकरे वय ७०, चांदोरफाटा, तळीवाडी, रत्नागिरी यांनी आपल्या घरापासून २०० फूट अंतरावर असलेल्या गोठ्यामध्ये ३५ लहान-मोठ्या गाई, बोकड, बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. ७ फेब्रुवारीला ते गायीचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता गोठ्याचा सिमेंटचा दरवाजा फोडून ४ शेळ्या, एका बोकडाची चोरी झाल्याचे त्यांनी प्रथम पहिले. आजूबाजूला शोधशोध केली असता काहीच हाती लागले नाही. चोरीस गेलेल्या जनावरांची किंमत ३८  हजार रुपये होती. परंतु याबद्दल फिर्याद देण्यात आली असता, ती घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते.

याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे यांनी या प्रकरणी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेत यावर चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तक्रार सखाराम कोकरे यांची तक्रार दाखल करण्यात आली. यासंदर्भात १० महिने उलटून गेले तरी, गुन्हा दाखल होत नसल्याबाबतचे वृत्त मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाद्वारे सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर  पूर्णगड पोलिसांकडून अज्ञातावर भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular