26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriमांडवी पर्यटन संस्थेच्या वतीने निकृष्ट बंधाऱ्याचे काम थांबविण्याची मागणी

मांडवी पर्यटन संस्थेच्या वतीने निकृष्ट बंधाऱ्याचे काम थांबविण्याची मागणी

मांडवी पर्यटन संस्थेच्या वतीने कार्यकारी अभियंता पत्तन विभाग यांना निकृष्ट दर्जाचे बंधाऱ्याचे काम तात्काळ थांबविण्यात येण्याबाबत पत्र देण्यात आले.

रत्नागिरी शहरातील खालच्या भागामध्ये सार्वजनिक बांधकामच्या पत्तन विभागामार्फत मांडवी जेटी पार्कींग ते नाईक फॅक्टरी असे धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम के.एस. पवार नामक ठेकेदाराकडुन निकृष्ठ दर्जाचे काम केले जात आहे. हा बंधारा बांधण्याचे काहीही नियोजन त्याच्याकडे नसून, थेट वाळुच्या किनाऱ्यावर हा बंधारा रचला जात आहे. आतमध्ये दगडाचा चूरा घालुन कमी वजनाचे काळे दगड वरवर रचून बंधारा बांधण्यात येत आहे.

पावसाळ्यात सुमारे ५ ते ६ फुट वाळू खणुन समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या खालच्या वाळुची धूप होऊन हा निकृष्ट दर्जाचा बंधारा होऊन नष्ट होणार आहे. या बंधाऱ्यामुळे किनाराच नष्ट होणार असून होडीवाले मच्छिमार आणि भेळ, कणीस आणि शहाळी विक्रेते यांनासुद्धा मनस्ताप सहन करावा  लागणार आहेत.

मांडवी किनारी किती फुटी रस्ता होणार आहे, किती फुटाचा फुटपाथ होणार आहे. गटार कुठे होणार आहे याचा खुलासा नगरपालिकेने केल्याशिवाय पत्तन अभियंत्यानी बंधाऱ्याच्या कामाला हात लावु नये अशी भुमिका मांडवी पर्यटन संस्थेच्यावतीने घेण्यात आली. किनाऱ्या लगतच्या रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. गणपती विसर्जन सुद्धा करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मांडवी पर्यटन संस्थेच्या वतीने कार्यकारी अभियंता पत्तन विभाग यांना निकृष्ट दर्जाचे बंधाऱ्याचे काम तात्काळ थांबविण्यात येण्याबाबत पत्र देण्यात आले. यावेळी मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, उपाध्यक्ष नितीन तळेकर, मांडवी भैरी देवस्थान अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, अक्षय शिवलकर, पंकज खेउर, आकांक्षा सुर्वे,  प्रफुल्ल शिवलकर, उदय हातीसकर, प्रसाद सुर्वे, समीर शिवलकर,  गौरी शिवलकर, श्वेता धनावडे, रीना सुर्वे, रोहीत सुर्वे, रीया वारंग आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular