26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriमराठा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही : नारायण राणे

मराठा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही : नारायण राणे

आम्हाला कुणबीचं आरक्षण नको आहे.

मराठा समाजाचा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही. आम्हाला कुणबीचं आरक्षण नको आहे. आर्थिक मागास म्हणून घटनेच्या १५ आणि १६ (४) मध्ये जी तरतूद आहे, त्यानुसार राज्य शासनाने सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारने तो अधिकार वापरावा, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अखिल मराठा फेडरेशनतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल मराठा महासंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, “महाराष्ट्रात ३० टक्के मराठा समाज आहे. मराठा समाज इतक्या वर्षांनंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही. समाजात दारिद्र्यरेषेखाली मोठी संख्या आहे, बेकारी आहे. एकूणच मुंबई व महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावी. व्यवसाय लहान असो मोठा असो. मेहनत, परिश्रमाने आपण तो व्यवसाय यशस्वी करावा. त्यातून आर्थिक सुबत्ता येईल.”

ते म्हणाले, “मी मराठा असल्याचा मला अभिमान आहे. मराठा आरक्षणासाठी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर मी सहा महिने महाराष्ट्रात फिरून अहवाल सादर केला. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला की, उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये, असे छगन भुजबळ यांनी पत्र दिले आहे. त्यानंतर मी भुजबळ यांना फोन करून विनंती केली व आम्ही कुठल्याही समाजाचे आरक्षण मागितले नाही. आर्थिक मागास निकषावर १६ टक्के आरक्षण मागितले आहे. घटनेच्या १४ (४) व १५(४) कलमातील तरतुदीप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे. भुजबळ यांना समजावून सांगितले. “त्यानंतर बैठकीत प्रस्ताव आला. त्या “वेळी विरोधात एक-दोन जण बोलले. त्यानंतर बैठकीत कोणी बोलायला तयार नव्हते. मी विषय रेटून नेला व हा प्रस्ताव संमत झाला.”

राणे म्हणाले, “मराठा समाजाने शेती, नोकरी, उद्योग, समाजकारण, राजकारण आपण कुठे उभे आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात १५ कोटी लोकसंख्येत मराठा समाजाची लोकसंख्या ३० टक्के आहे; परंतु आयएएस, आयपीएसमध्ये १५ टक्के युवक आहेत. दारिद्र्यरेषेखाली मराठा समाजाची लोकसंख्या २२ टक्के आहे. फेडरेशनमधील सर्व मराठा संस्था, संघटनांना एक दिवस बोलवावे आणि शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजाची स्थिती यावर चर्चा करून उद्दिष्ट निश्चित करावे.”

मार्केटिंग स्किल – जपानमध्ये ९०० ग्रॅमचा आंबा वाढदिवसाला भेट देतात. त्याची किंमत सव्वालाख रुपये. या आंब्याची रोपं गुजरात-महाराष्ट्राच्या सीमारेषेवर पारशी माणसाकडे आहे. एका मॉलमध्ये चिनी झाड १५०० रुपयांना विकले जाते. या झाडामुळे प्रगती होते, असे सांगतात. हे मार्केटिंग स्किल आहे. हे मराठा समाजाने समजून घेतले पाहिजे, असे राणे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular