26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriरत्नागिरीत समाजाची भुमिका, मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण हवे

रत्नागिरीत समाजाची भुमिका, मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण हवे

मराठा समाजाची तालुका संघटना स्थापनेचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळायला हवे. अन्य वर्गात सामावून आरक्षण नको, अशी भुमिका गुरुवारी रत्नागिरी माळनाका यथील मराठा भवन येथे पार पडलेल्या तालुक्यातील सर्व मराठा बांधव आणि भगिनींच्या बैठकीत घेण्यात आली. मराठा समाजाची तालुका संघटना स्थापनेचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शैक्षणिक सामाजिक आर्थिक आरक्षण मिळण्याबाबत या बैठकीत मते मांडण्यात आली. नव्याने स्थापल्या जाणाऱ्या संघटनेत ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांना कार्यकारणी सामावून घेण्यात यावे, असे यावेळी स ठरवण्यात आले. संघटना कशासाठी हवी? याबाबत अनेकांनी यावेळी आपली मते मांडली.

तालुका कार्यकारीणीत काम करण्यास इच्छुक असणाऱ्याची यावेळी चाचपणी करण्यात आली. पूर्ण वेळ देता येईल अशानीच ही जबाबदारी घ्यावी असे ठरवण्यात आले. तालुका कार्यकारणीमधून जिल्हा कार्यकारिणीवर ठराविक प्रतिनिधी पाठवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. महिलांसाठी वेगळी विंग असावी, असेही याबाबत चर्चेत ठरवण्यात आले. सोशल मीडिया ग्रुप तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. समाजात कोणाला अडचण निर्माण होत असतील तर सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी चिपळूण इथून आलेले सुधीर भोसले यांनी नेमकी आरक्षणाची परिस्थिती काय? याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. तसेच आप्पा देसाई, संतोष सावंत, राकेश नलावडे, यांनीही मार्गदर्शन केले. पालीचे तात्या सावंत, मालगुंडचे नंदू साळवी, दिनेश सावंत यांनी सुद्धा विचार मांडले. यावेळी भाऊ देसाई, सतीश साळवी, केशवराव इंदुलकर, कौस्तुभ सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. मराठा मंडळ तसेच क्षेत्रीय मराठा मंडळ यांनी एकत्रित या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES

Most Popular