22.9 C
Ratnagiri
Friday, February 20, 2026

पानवल धरणाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात रत्नागिरीकरांना दिलासा

रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या...

कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा

समुद्राची गाज आणि वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर यामुळे कशेळी...

बावनदी पूल वाहतुकीस खुला एका मार्गिकेवरून प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत...
HomeChiplunचिपळुणातील उड्डाण पुलासाठी मार्च २०२६ चा मुहूर्त!

चिपळुणातील उड्डाण पुलासाठी मार्च २०२६ चा मुहूर्त!

सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती आली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जुने पिअर तोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. आता नवीन पिअर कॅप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. तसेच पुलाच्या एकाबाजूने गर्डर चढविण्याचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत ३२ गर्डर चढविण्यात यश आले आहे. दोन क्रेनच्या सहाय्याने हे काम युद्धपातळीवर केले जात आहे. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रति कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.

साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू करण्यात आले. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्‌या समोर आल्या. तातडीने केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलांची तपासणी करण्यात आली होती. या समितीच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्येच बदल सुचवले होते.

‘भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ – मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हद्दीतील पाग, पॉवरहाऊस येथे असलेल्या चौकातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले असून त्यात काहीना आपले प्राणही गमवावे लागले होते. सततच्या अपघाताच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कामयुद्धपातळीवर सुरु – यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते. त्यामधील अंतर कमी करुन ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तेथे अतिरिक्त पिअर उभारण्यांत आले आहेत. आता नवीन रचनेनुसार या पुलाचे काम सुरु केले आहे. यामध्ये पिअर कॅप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून एकूण ९५ पिअर कॅपपैकी अर्ध्याहून अधिक पिअर कॅपचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. आता उर्वरित पिअर कॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आले असून त्याआधारे महिनाभरात ३२ गर्डर चढविण्यात आले. हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular