22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriलांजा डेपोतून प्रत्येक श्रावणी सोमवारी मार्लेश्वर दर्शन बससेवा

लांजा डेपोतून प्रत्येक श्रावणी सोमवारी मार्लेश्वर दर्शन बससेवा

महिला सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत दिली जाणारा असून ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना १००% मोफत प्रवास मिळणार आहे.

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर लांजा एसटी आगारामार्फत प्रत्येक सोमवारी लांजा ते मार्लेश्वर अशी मार्लेश्वर दर्शन विशेष बस सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापिका काव्या पेडणेकर यांनी दिली. श्रावण महिन्यातील दर सोमवारी लांजा एसटी आगारामार्फत सकाळी ८ वाजता लांजा बसस्थानकातून मार्लेश्वर दर्शन विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवास भाडे केवळ १२५ रुपये ठेवण्यात आले आहे.

तर महिला सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत दिली जाणारा असून ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना १००% मोफत प्रवास मिळणार आहे. लांजा कोर्ले भांबेड मार्गे मार्लेश्वर अशी ही बस फेरी सोडली जाणार असून या विशेष बस फेरीचा लांजावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापिका काव्या पेडणेकर यांनी केले आहे. यासाठी अनिल लांजेकर ९४२३२९७२९७ आणि विद्याधर कुवेस्कर ९०२१५५०८११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular